शिवाजी विद्यापीठ कॅम्पसमधील इंजिनीरिंग कॉलेज: डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी
कोल्हापूर शहरातील विद्यानगर शिवाजी विद्यापीठ येथे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर जवळ अतिशय शांत व निसर्गरम्य वातावरणात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांनी युक्त असलेले “डिपार्टंमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, हे एक दर्जेदार व गुणवत्तापूर्ण असणारे इंजिनियरिंग शिक्षणाचे महत्त्वाचे केंद्र आहे.
उत्कृष्ट व्यवस्थापन, अनुभवी व उच्च विद्याविभूषित तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज कॉम्प्युटर लॅब, समृद्ध ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, मुला-मुलींसाठी स्वतंत्र प्रशस्त, हवेशीर व सर्व सुविधायुक्त वसतिगृह (हॉस्टेल); तसेच मेसची सुविधा, ही डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीची वैशिष्ट्ये आहेत. विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम,संशोधन स्पर्धा व अनेक स्पर्धा परीक्षांमार्फत विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करण्याचे कार्य, तसेच भविष्यातील उच्च शिक्षणाची पायाभरण्याचे कार्य केले जाते.
डिपार्टंमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये इंजिनियरिंग प्रथम वर्ष 2021-22 तसेच डायरेक्ट द्वितीय वर्ष 2021-22 (डिप्लोमानंतर) करिता प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार आहे. या ठिकाणी आपल्या पाल्याचा प्रवेश म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आहे. डिपार्टंमेंट ऑफ टेक्नॉलॉजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे. त्यामुळे डिपार्टंमेंट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये, आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करा आणि त्याच्या भवितव्याविषयी निश्चिंत राहा.
अधिक माहितीसाठी: डिपार्टंमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर,416004.