75th Independence Day of India: Information of National Flag
भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन, भारताच्या राष्ट्रीय ध्वजाची माहिती
15 ऑगस्ट, 2021 रोजी आपण भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. या अनुषंगाने, भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आपण माहीती बघणार आहोत. आपण सर्व भारतीयांना जगण्यासाठी आणि मरण्यासाठी आपला ध्वज ओळखणे खूप आवश्यक आहे. हा आपला राष्ट्रध्वज मुक्त देशाचे प्रतीक आहे. आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल तुम्हाला माहित असायलाच पाहिजे अशा गोष्टी आपण बघूयात.
आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या शीर्षस्थानी भगवा (केसरीया), मध्यभागी पांढरा आणि तळाशी समान प्रमाणात हिरवा रंगाचा आडवा तिरंगा आहे. या राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा रंग असल्यामुळे, या झेंड्याला तिरंगा म्हणून संबोधले जाते. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे. हा राष्ट्रध्वज खादीच्या किंवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी निळ्या रंगाचे चक्र आहे. शीर्ष भगवा रंग आपल्या देशाची ताकद आणि धैर्य दर्शवतो.
पांढरा मधला पट्टा धर्मचक्राने शांती आणि सत्य दर्शवतो. हिरवा रंग जमिनीची सुपीकता, वाढ आणि शुभता दर्शवतो. मधल्या पांढर्या रंगात निळ्या रंगाचे २४ आर्यांचे अशोक चक्र आहे. या चक्रची रचना सम्राट अशोकच्या सारनाथ येथील सिंहमुद्रेवर असणाऱ्या “अशोक चक्राची” आहे. आपल्या राष्ट्रध्वजाच्या पहिल्या स्थापनेपासून झालेला विविध बदल पाहणे खरोखर आश्चर्यकारक आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यादरम्यान ते शोधले गेले किंवा ओळखले गेले. या राष्ट्रध्वजाची उत्क्रांती करण्यासाठी असंख्य लोकांना अनेक संकटातून मार्गक्रमण करावे लागले. 22 जुलै 1947 रोजी भारतीय संविधान सभेने आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन स्वीकारले.
चला तर मग, 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नियमांचे पालन करून झेंडा फडकवुया. आणि आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान वाढवुया. भारत माता कि जय, वंदे मातरम् !