Kolhapur: Traditional Nalband Business

बैलाला नाल किंवा पत्री मारणे

मित्रांनो भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे, शेतीसाठी बैलांचा वापर सर्रास केला जातो.  शेतात राबणाऱ्या व बैलगाडी ओढणाऱ्या बैलाचे पाय चालताना घसरू नये, तसेच त्यांच्या खुरांची वाढ थांबवण्यासाठी त्यांना नाल मारली जाते. याला पत्री मारणे असे देखील म्हणतात.

बैलांना नाल मारणारी माणसे आता कमी कमी होत चालली आहेत आणि लवकरच ही माणसे मिळायलादेखील कठीण होणार आहेत. बैलांना नाल मारणे हा व्यवसाय नसून एक कला आहे. त्यामुळेच इकबाल जमादार व सरदार जमादार यांनी पारंपारिकरित्या चालणारा त्यांचा हा व्यवसाय अजूनही जिवंत ठेवला आहे.  या व्हिडिओमध्ये आपण बैलाला नाल कसे मारतात ते बघायला मिळेल. तुम्ही जर कोल्हापूरात राहणारे असाल, आणि तुमच्या जनावरांना नाल किंवा पत्री मारायची असेल तर तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता.

इकबाल जमादार (9850764752)

सरदार जमादार (9922810157)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *