Tokyo Olympics 2020: Indian team win bronze medal in hockey

चालू असलेल्या टोकियो ऑलिंपिक २०२० स्पर्धेमध्ये भारत विरुद्ध जर्मनी पुरुष हॉकी संघात कांस्य पदकाचा सामना झाला. पहिल्या क्वार्टरमध्ये ०-१ ने मागे असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या आणि तिसऱ्या क्वार्टरमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत कांस्य पदकावर नाव कोरण्यात यशस्वी झाले. भारताने ५-४ ने जर्मनीला पराभव करून अंतिम सामना जिंकला आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने ऑलिंपिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला आहे.