जागतिक हृदय दिन
हृदय हे आपल्या शरीरातील सर्वांत महत्वाचा अवयव असून आपल्या शरीराला प्राणवायू आणि पोषक घटकांसह रक्तपुरवठा करते.आपले हृदय प्रत्येक सेकंदाला प्रत्येक घटकाला काम करत असते.
त्यामुळे हृदयाची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. हे महत्त्व सर्वांना कळावे, म्हणून 2९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून साजरा केला जातो. हृदयरोग टाळण्यासाठी, खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी. अधिक तळलेले अन्नपदार्थ, मसालेदार अन्नपदार्थ तूप, मीठ, आणि मिठाई खाल्याने शरीरातील चरबी वाढते. सध्याच्या युगात अल्कोहॉल पिणे आणि धूम्रपान करणे, हे फॅशन मानले जाते. परंतु धूम्रपान आणि दारू पिण्याच्या सवयीमुळे हृदयाला नुकसान पोहोचते. हे टाळण्यासाठी आपण जीवन हे नशामुक्त असणे आवश्यक आहे. नियमित योग व ध्यानधारणा केल्याने, आपले हृदय ताकदवान बनते.
अनेक व्यक्तींशी मनमोकळ्या गप्पा मारा मारून एकटे राहण्याचे टाळा. आनंद असो किंवा दुःख असो, ते इतरांना सांगण्याची सवय लावून घ्या.
आपण या, जागतिक हृदय दिन निमित्ताने आनंदी,निरोगी आणि सशक्त जीवन जगण्याचा संकल्प करूया…!