World Tourism Day 2021
27 सप्टेंबर रोजी, संपूर्ण जगात जागतिक पर्यटन दिवस (World Tourism Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपला देश पर्यटन दृष्टीने समृद्ध देश आहे. देश-विदेशातील पर्यटक भारतातील विविध स्थळांना भेट देऊन तिथले अविस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलमध्ये किंवा कॅमेरात कैद करतात. जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात 1970 पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. 27 सप्टेंबर, 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने आजच्या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेट देणं, स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते.सर्वच पर्यटन क्षेत्र जगातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक मूल्ये वाढवण्यास मदत करतात. मन आणि शरीर प्रसन्न करणारी गोष्ट म्हणजे पर्यटन. एका ठरावीक कालावधीनंतर आपल्या नित्यक्रमातून वेळ काढून प्रवास, पर्यटन केल्यास जीवनात उत्साह संचारतो. तसेच कामात नव्या जोमाने कार्यरत होण्यास मदत मिळते. पर्यटनासाठी आपल्या जीवनातील थोडा वेळ काढणे खूप महत्वाचे आहे. ऑक्टोबर मध्ये सर्व पर्यटन क्षेत्रं खुली होतील.