Importance of World Health Day जागतिक आरोग्य दिनाचे महत्व
जगभरात 7 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा होत असतो. जागतिक आरोग्य संघटनेतर्फे प्रत्येक वर्षी या दिवशी एक वेगळी थीम निवडली जाते. त्या थीमनुसार जागतिक आरोग्य दिन साजरा होतो. जगातिक आरोग्य दिन 2022 ची थीम ‘Our Planet, Our Health’ म्हणजेच ‘आमचा ग्रह, आमचे आरोग्य’ ही आहे. वाढते प्रदूषण, महामारी, गंभीर आजारांपासून लोकं आणि संपूर्ण जगला दूर ठेवण्यासाठी या थीमनुसार जनजागृती केली जाणार आहे. या दिनानिमित्त डॉक्टर संदीप पाटील यांनी लोकांना महत्वपूर्ण संदेश दिला.