Lok Raja Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Gratitude Festival लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व

दिनांक १८ एप्रिल २०२२ पासून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती ताराराणी रथोत्सव पासून लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्वाची सुरवात झाली. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीचे औचित्य साधून, राजर्षी शाहू महाराजांनी सुरु केलेल्या जोतिबा यात्रेनंतर, महालक्ष्मी रथोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी जोतिबा यात्रेत येणाऱ्या भाविकांना आपला इतिहास आणि पूर्वजांचे कार्यओळख, स्मरण व्हावे यासाठी रथोत्सवाची सुरुवात केली होती. ही परंपरा आजची सुरु आहे. काल सायंकाळी ६:३० वाजता जुना राजवाडा, भवानी मंडप येथून या उपक्रमाची सुरुवात झाली. श्रीमंत छत्रपती शाहू, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार छत्रपती संभाजी, छत्रपती मालोजी, नामदार राजेंद्र पाटील आणि नाम. हसन मुश्रीफ यांच्यासह लोकप्रतिनिधी, तालीम मंडळे, विविध सामाजिक संस्था, संघटनांचे कार्यकर्ते, आणि कोल्हापूरचे नागरिक यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात झाली. त्यामुळे, दिनांक १८ एप्रिल पासून २२ मी पर्यंत होणाऱ्या सर्व उपक्रमांचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *