Instruction for Student Admission Process Shivaji University Kolhapur
अनेक कोर्सेससाठी अंतिम गुणवत्ता यादी दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी शिवाजी विद्यापीठाच्या website वर www.unishivaji.ac.in प्रसिद्ध करण्यात आली होती. ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचा पसंतीक्रम (Preference) http://sukapps.unishivaji.ac.in/pgentrance/#/login या लिंक वर दिनांक 20 व 21 ऑगस्ट या दोन दिवसात देणे अनिवार्य होते. जर पसंतीक्रम (Preference) सुविधा एखाद्या अभ्यासक्रमास उपलब्ध आहे , त्या अभ्यासक्रमाचे सर्व पसंतीक्रम देणे आवश्यक आहे. ज्या अभ्यासक्रमास पसंतीक्रम (Preference) देण्याची सुविधा उपलब्ध नसेल, तर तेथे पसंतीक्रम देण्याची आवश्यकता नाही. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार गुणवत्ता यादी दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानुसार विद्यार्थ्यांनी कागदपत्रे पडताळणीसाठी व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संबंधित अधिविभागांमध्ये स्वखर्चाने सकाळी 10 वाजता हजर राहणे आवश्यक आहे. विद्यापीठात आल्यावर विद्यार्थ्यांना अधिविभागाची माहिती नसल्यास विद्यापीठ सुरक्षा कर्मचारी यांची मदत घेण्यात यावी.
प्रवेश घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे
विद्यार्थ्यांनी अधिविभागात कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी पुढील नमूद करण्यात आलेली सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रती घेऊन येणे आवश्यक आहे. संबंधित अभ्यासक्रमासाठी भरणा केलेल्या प्रवेश अर्जाची प्रत, दहावी-बारावी, ग्रॅज्युएशन मार्कलिस्ट, राखीव प्रवर्गाकरिता जातीचा दाखला आवश्यक, Non Creamy Layer Certificate (आवश्यकतेनुसार), दिव्यांग असल्यास त्याबाबतचे (Physically Challenged) प्रमाणपत्र, माजी सैनिक (Ex-service) प्रमाणपत्र, अल्पसंख्यांक असल्याचे प्रमाणपत्र व इतर अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्यांनी घेऊन येणे आवश्यक आहे.
सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचे प्रवेश पत्र (Allotment Letter) त्यांच्या लॉगीन मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.
अधिभागात होणारे प्रवेश हे संपूर्ण संगणकीय प्रणालीतून होणार असल्यामुळे संबंधित अभ्यासक्रमाचे शैक्षणिक शुल्क फक्त ऑनलाईन मोडमध्येच (Debit Card, Credit Card, UPI Payment माध्यमातून) स्वीकारण्यात येणार आहे. सर्व विद्यार्थ्यांनी पेमेंट करताना Debit Card, Credit Card, UPI Payment या सुविधांचा वापर करून पेमेंट आदा करावे.
प्रथम प्रवेश फेरीचा तपशील
दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी जागा जाहीर करण्यात येणार आहेत.
दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी रसायनशास्त्र अधिविभाग व्यतिरिक्त सर्व अधिविभाग करता प्रथम प्रवेश फेरीची तारीख आहे.
दिनांक 25 व दिनांक 26 ऑगस्ट 2022 रोजी फक्त रसायनशास्त्र अधिविभाग करिता प्रथम प्रवेश फेरीची तारीख आहे.
द्वितीय प्रवेश फेरीचा तपशील संकेतस्थळावर www.unishivaji.ac.in प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने झालेला बदल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यार्थांनी ऍडमिशन घेण्याकरिता फक्त आणि फक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळाला (www.unishivaji.ac.in)भेट द्यावी.