Sumangalam Panchmahabhoot Lokotsav: Siddhagiri Math Kaneri

सिद्धगिरी मठ कणेरी येथे जगाला दिशा देणाऱ्या सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सवामध्ये देशातून 1000 साधु-संत व 500 हून अधिक विद्यापीठाचे कुलगुरू तसेच पारंपरिक 5000 वैद्य सहभागी होणार आहेत, अशी माहिती काडसिद्धेश्वर स्वामी यांनी सांगितली आहे. काडसिद्धेश्वर स्वामीम्हणाले आदर्श गाव, आत्मनिर्भर गाव, समृद्ध शेती, कुटीर उद्योग यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तंटामुक्त, विषमुक्त, रोगमुक्त व समृद्ध गाव निर्माण केले जाणार आहे. एक झाड अनेक कारणांसाठी उपयोगी पडते. त्यासाठी एका झाडाचे मनोगतही मांडण्यात आले आहे. एक एकर शेतीमध्ये देश-विदेशातील सर्व धान्ये, भाज्या पिकवल्याची प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहेत. सेंद्रिय पीक पद्धतीची माहिती दिली जाणार आहे. पुनर्वापर निर्मिती यामध्ये युवकांना रोजगार निर्माण, अगरबत्ती, फूलनिर्मितीच, जैविक रंग निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *