Shivaji University: District Level Online Youth Festival 2020-21
शिवाजी विद्यापीठाचे ऑनलाईन जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2021
शिवाजी विद्यापीठाचा युवा महोत्सव यावर्षी ऑनलाईन भरण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्हानिहाय स्वतंत्र महोत्सवाचे नियोजन केले असून सोमवारपासून या महोत्सवाला प्रारंभ झाला आहे. मागच्या वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा महोत्सव भरण्यात आला नव्हता, त्यामुळे कलाकार विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला होता. म्हणूनच यावर्षी ऑनलाईन पद्धतीने महोत्सव भरवण्याचा निर्णय विद्यापीठामार्फत घेण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यामध्ये जिल्हानिहाय महास्वाचे आयोजन केले आहे. याचे सविस्तर वेळापत्रक व नियमावली विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे. सदरचा कार्यक्रम गुगल मीट प्लॅटफॉर्मद्वारे होणार आहे.
महोत्सवाचे उदघाटन समारंभ पार पाडल्यानंतर, पहिल्या दिवशी रांगोळी, मराठी वक्तृत्व, हिंदी वक्तृत्व, शास्त्रीय गायन, शास्त्रीय नृत्य, व्यंगचित्र आणि शास्त्रीय सुरवाद्य असे विविध कलेचे सादरीकरण झाले. मंगळवारी भित्तीचित्र, एकपात्री अभिनय, सुगम गायन, कातरकाम, मेहंदी आणि पाश्चिमात्य वाद्य वादन अशा स्पर्धा होणार आहेत. तसेच, बुधवार दिनांक १४ जुलै रोजी, महोत्सवाची सांगता इंग्रजी वक्तृत्व,शास्त्रीय तालवाद्य, पाश्चिमात्य संगीत वादन, मातीकाम, पाश्चिमात्य एकल गायन, स्थळचित्र आणि नकला अशा स्पर्धांनी होणार आहे.