International Literacy Day: जागतिक साक्षरता दिन
दरवर्षी 8 सप्टेंबरला संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
शिक्षणाचे, साक्षरतेचे महत्त्व जगभरात पटवून देण्यासाठी युनेस्कोमार्फत 8 सप्टेंबर 1966 पासून जगभरात जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
वैयक्तिक, सामुदायिक आणि सामाजिकदृष्ट्या साक्षरतेचे महत्त्व लोकांना पटवून देणे हे या दिवसाचे महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. या दिनानिमित्त
जगभरातील लोकांना शिक्षणाबद्दल जणजागरूक केले जाते, जेणेकरून ते देशाचे भविष्य चांगले बनवू शकतील.
गेल्या काही काळात भारतात साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. साक्षरतेच्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी व लोकांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी भारत सरकारने ग्रामीण तसेच शहरी भागांत वेगवेगळ्या योजना राबविल्या. सर्व शिक्षा अभियान, प्रौढ शिक्षा योजना, समग्र शिक्षा अभियान आणि राजीव गांधी साक्षरता मिशन याारख्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करण्यात सरकारला यश आले आहे.
सरकारने रोजगाराच्या व स्वरोजगाराच्या नवीन संधी व कौशल्य विकासावर भर द्यायला सुरुवात केली आहे. यासाठी देशभरात अनेक ठिकाणी उत्तम प्रशिक्षण व संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे.
India Census.net च्या अहवालानुसार, भारतातील साक्षरता दर 74.4% आहे. केरळ, लक्क्षद्विप, मिझोरम तसेच गोवा राज्यांमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचा साक्षरता दर 82.34% आहे.
बिहार राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी म्हणजे 61.80% इतके आहे.
शिक्षित व्यक्ती कायम अग्रेसर असतात. त्यामुळे शिक्षणाचे महत्त्व देशाला पटवून देण्यासाठी आपण जागतिक साक्षरता दिवस साजरा करूया.
गांधी जी का यही था कहना, अनपढ़ बनकर कभी ना रहना। शिक्षा हमें जगाती है, शोषण से हमें बचाती है!