कोल्हापुरातील प्रसिद्ध खासबाग मैदान कुस्त्यांसाठी सज्ज
बऱ्याच कालावधीनंतर कुस्तीपंढरी कोल्हापुरात बेमुदत निकाली कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन चे चीफ पेट्रन शाहू महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने हे कुस्ती मैदान होणार आहे. आज दि. 7 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3 वाजल्यापासून कुस्त्यांना सुरुवात होईल.
मुख्य 5 कुस्त्यांसह 107 चटकदार कुस्त्यांसाठी ताब्ब्दल 15 लाख बक्षिसांची घोषणा माजी खा. संभाजीराजे व माजी आ. मालोजीराजे यांनी केली आहे. कुस्ती स्पर्धेचा बक्षीस समारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख खा. शरद पवार, पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार, आमदार यांच्या हस्ते होणार आहे.
यानिमित्ताने शाहू छत्रपती महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त विशेष सत्कार चांदीची गदा देऊन करण्यात येणार आहे. दरम्यान मैदानाची जय्यत तयारी कोल्हापूर महानगपालिका व कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने करण्यात अली आहे. आखाड्यात नवीन लाल माती टाकून मैदान परिसरातील डागडुजी करण्यात आली आहे. कुस्ती मैदानात महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब आणि दिल्ली येथील मल्ल सहभागी होणार आहेत.